Friday, May 3, 2024
Homeनगरवाळूतस्कराकडून पैसे घेऊन सोडून दिले

वाळूतस्कराकडून पैसे घेऊन सोडून दिले

कोतवालीच्या दादाचा प्रताप; व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोतवालीच्या एका दादाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. चालकाकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिले. याप्रकरणी चालकाने एका व्हिडीओद्वारे याबाबत खुलासा केला आहे. आरोपीच्या पलायनामुळे आधीच चर्चेत असलेले कोतवाली पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.

- Advertisement -

कोतवालीच्या एका पोलीस हवालदाराने नेप्ती चौकात वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला. यावेळी डंपर चालक दादा पोपट माळी याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, डंपर चालकाने याबाबत एका व्हिडीओद्वारे खुलासा केला आहे. मला बळजबरीने डंपर सचिन ठाणगेचा असल्याचे म्हणण्यास लावले.

परंतु, मी डंपर माझाच आहे असे सांगितले. कोतवालीच्या या दादाने विचारले तुझ्याकडे किती पैसे आहेत. मी सांगितले साडेपाच ते सहा हजार रुपये आहे. कोतवालीच्या दादाने ते काढून घेतले व मला सोडून दिल्याचे माळी याने या व्हिडीओद्वारे खुलासा करून सांगितले आहे. यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या