Friday, November 15, 2024
Homeनगरअवधूत गुप्तेंच्या बाळासाहेब थोरात गिताने संगमनेरात धमाल

अवधूत गुप्तेंच्या बाळासाहेब थोरात गिताने संगमनेरात धमाल

संगमनेर (प्रतिनिधी)- ‘इस बंदेमे है कुछ बात ये बंदा लई जोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात’ या गीतासह महाराष्ट्रातील लोकप्रिय संगीतकार व गायक अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या विविध मराठमोळया गीतांना तरुणांनी टाळ्यांच्या व शिट्यांच्या गजरात साथ देत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमात संगमनेरकरांनी धमाल केली. विक्रमी गर्दीत विविध गाण्यांवर थिरकलेली तरुणाई यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात यशोधन मैदान येथे सुप्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांचा जल्लोष 2020 हा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथीलीताई तांबे, विश्वासराव मुर्तडक, सुनंदाताई जोर्वेकर, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, ललिताताई मालपाणी, मिनानाथ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्राचे रॉकस्टार अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘झेंडा’ चित्रपटातील ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्याने व्यासपीठावर धमाकेदार आगमन केले. ‘बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलला, जिथे – तिथे रुप तुझे दिसू लागले’ या गितांनी धमाल केली. तर ‘डिचपारी डिपांग काळी माती निळ पाणी हिरवा शिवार’ या गितावर अबाल वृध्दांसह महिलांनीही ठेका धरला.

अवधूत गुप्ते यांनी शेतकरी आत्महत्येवर सादर केलेल्या व पत्रास कारण की,बोलण्याची हिंमत नाही, पावसाची वाट बघण्यात आता काही गंमत नाही’ या गिताने प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. पार्श्वगायिका जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेली ‘ईमेल काल इंटरनेटवर केला’ या लावणीने धमाका उडवून दिला. तर कौस्तूभ गायकवाड यांनी गायलेले ‘आम्ही लग्नाळू’ या गिताला तरुणांनी उत्स्फूर्त दाद दिली.

सत्यजीत तांबेंवरील ‘सत्यजीत आला रे सत्यजीत आला’ या गिताला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. तर पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात गिताने तमाम उपस्थितांना गाण्यावर थिरकायला लावले.निवेदन सिनेअभिनेत्री अनुश्री फडणीस यांनी केले. यावेळी सर्व कलाकार, संयोजक, वादकवृंद, टेक्नीशयन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार इंद्रजित थोरात यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या