Friday, July 3, 2026
Homeनगरश्रीरामपूरच्या दोन डॉक्टरांसह 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

श्रीरामपूरच्या दोन डॉक्टरांसह 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

पूर्णपणे माहिती घेऊनच नवीन पेशंट तपासा : डॉ. जमधडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नेवासा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यात आल्यामुळे शहरातील त्या दोन डॉक्टरांसह 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंतराव जमधडे यांनी दिली.

- Advertisement -

तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या कोणत्याही नवीन पेशंटची मागील पार्श्वभूमी तपासल्याशिवाय अशा प्रकारच्या पेशंटची तपासणी करणे टाळा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वसंतराव जमधडे यांनी केले आहे.

नेवासा येथील रुग्ण श्रीरामपुरातील डॉक्टरांकडे तपासणीसाठी आला आणि या रुग्णाच्या स्रावाचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे श्रीरामपुरातील दोन मोठ्या डॉक्टरांसह या पेशंटच्या थेट संपर्कात आलेल्या 9 जणांचे स्राव घेऊन त्यांना नगर आणि लोणी येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांच्या सानिध्यात आला त्यांच्या सान्निध्यात आलेले सुमारे 32 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, या थेट संपर्कात आलेल्या डॉक्टरांसह 11 जणांच्या स्रावाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. जमधडे यांनी दिली. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या वातावरणात तालुका बाहेरुन किंवा जिल्ह्याबाहेरून आलेल्या कोणाही अपरिचित रुग्णाची तपासणी करताना अगोदर त्या रुग्णाच्या आजाराची पूर्वीची हिस्ट्री जाणून घ्यावी, शिवाय त्याला सध्या असलेल्या आजाराची लक्षणे काय आहेत, हे बारकाईने पहावे, संशय वाटल्यास तातडीने सरकारी यंत्रणेला सदर रुग्णाबाबत कळवावे.

जेणेकरुन अशाप्रकारे डॉक्टरांनी काळजी घेतल्यास डॉक्टरांच्याही सुरक्षेचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात सुरक्षित राहू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शिवाय दवाखान्याच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. डॉक्टरांनीही शक्यतो पेशंट तपासताना सर्व त्या सुरक्षेच्यादृष्टीने असणार्‍या साधनांचा वापर करावा. या प्रसंगात घाबरुन न जाता पेशंट तपासताना विशेष काळजी घेऊन यातून सर्व मिळून मार्ग काढू, असेही डॉ. जमधडे म्हणाले.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...