Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर : ‘त्या’ उर्वरित 19 व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह

श्रीरामपूर : ‘त्या’ उर्वरित 19 व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह

14 दिवस ठेवणार देखरेखीखाली

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या पहिल्या दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले होते. काल उर्वरित 19 व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांनी दिली.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरुणास कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा होऊन त्या तरुणाच्या संपर्कातील सुमारे 21 व्यक्तींना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल अगोदरच निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित 19 व्यक्तींचे अहवालही काल प्राप्त झाले. त्यांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या सर्वांना आता तालुक्यातील वडाळा महादेव येथील होमिओपॅथिक महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्ड येथे 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वसंतराव जमदाडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या