Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक येथे अडकलेले नागालँडचे विद्यार्थी मूळ गावी रवाना

नाशिक येथे अडकलेले नागालँडचे विद्यार्थी मूळ गावी रवाना

नाशिक : शहरात अडकलेले नागालँड येथील काही विदयार्थी मूळ गावी रवाना झाले आहेत. हे विद्यार्थी लॉक डाऊन झाल्यामुळे शहरात अडकून पडले होते.

दरम्यान लॉक डाऊन चा पाचवा टप्पा असून अद्यापही अनेकजण शहरात थांबून आहेत. नागालँड येथील काही तरुण नाशकात शिक्षणासाठी, नोकरी निमित्त तसेच पर्यटनासाठी आले होते. परंतु लॉक डाऊनमुळे शहरात अडकून होते. जिल्हा प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी रवाना करीत आहेत. अशातच नागालँड येथील काही तरुणांना देखील रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी या विद्यार्थ्यासोबत छात्रभारतीचे समाधान बागुल यांनी संवाद साधला. तसेच युवा- अनुभव शिक्षा केंद्र यांच्याकडून या नागरिकांना चार पाच दिवस पुरेल इतका कोरडा नाश्ता प्रवासात दिला आहे. या नागरिकांनी महाराष्ट्रासह युवा-अनुभव शिक्षा केंद्राचे आभार मानत नागालँडसाठी रवाना झाले.

जीवन रथ – गरजू लोकांना मदत

जीवन रथ ही मोहीम स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी असुन नाशिक मधुन स्थलांतर करणारे स्थलांतरित विद्यार्थी, मजुर, नागरीक यांना या मोहीम अंतर्गत पाण्याची बाटली, बिस्किटे, फ्रुटी, भेळभत्ता, शेंगदाणा चिक्की, ओआरएस पावडर हे सर्व प्रवासासाठी लागणारे जीवनावश्यक पदार्थांचे वाटप करण्यात येते.

सदर मदतकार्यात युवा-अनुभव शिक्षा केंद्राचे नितिन मते, समाधान बागुल, वंदना मते, ऋषिकेश मते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या