Friday, May 3, 2024
Homeनगरकोरोना – संगमनेरात 15 संशयित आढळले, उपचारार्थ नगरला पाठविले

कोरोना – संगमनेरात 15 संशयित आढळले, उपचारार्थ नगरला पाठविले

संगमनेर (प्रतिनिधी) – देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असतांना आज संगमनेरात 15 व्यक्ती संशयीत आढळून आल्या आहेत. त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली आहे.

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे एक कोरोना बाधीत व्यक्ती आढळून आला आहे. संगमनेरचे हे 15 व्यक्ती जामखेड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. या व्यक्ती कोरोना बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी त्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील उपचारार्थ नगर येथे हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या