मुंबई : लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे घरात बंदिस्त झालेल्यांना स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागत आहे. स्मार्टफोन जिवाभावाचा सोबती झालेला आहे. परंतु स्मार्टफोनदेखील इंटरनेट असेपर्यंतच उपयुक्त सिद्ध होत आहे.
व्हाट्सअप ,फेसबुक ,टिकटॉक व सोशल मीडिया, युट्युब व्हिडिओ, वेबसेरीज पाहताना सिमकार्ड कंपनीने दिलेला डेली डेटा संपून जातो. तेव्हा पैसे खर्च करून पुन्हा डेटा पॅक मारावा लागतो किंवा मग डेली डेटासाठी दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते. तेव्हा दिवसभर वापरला जाणारा अनावश्यक डेटा कसा वाचवायचा तसेच घरात वीज गेलीय आणि मोबाईलच्या बॅटरीचा चार्जिंग संपल्यावर मोठी समस्या निर्माण झाल्यासारखं वाटतं. तेव्हा चार्जिंग जास्तवेळ टिकवायच, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.
# डेटा वाचवायचा !
१. सध्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचा सर्वाधिक वापर होतोय आणि यामुळेच संपतो. व्हॉट्सअपवर असलेला media auto Download हे ऑफ करावे ज्यामुळे आपल्याला हवे तेवढेच फोटो, व्हिडिओ डाउनलोड करता येतात. ज्यामुळे अनावश्यक मीडिया फाईल डाउनलोड होत नाही आणि डेटाचा वापर देखील कमी होतो.
२. युट्युब , वेबसेरीज तसेच इतर ऑनलाईन विडिओ streaming साठी जास्त इंटरनेट वापरले जाते. ऑनलाईन विडिओ High resolution चे व्हिडिओमुळे जास्त डेटा खर्च होतो. ते टाळण्यासाठी कमी resolution सेट करून विडिओ बघावे
३. YouTube चे video डाउनलोड करून नंतर हवे तेव्हा पाहावे ज्यामुळे वारंवार बघण्यासाठी खर्च होणारा डेटा वाचेल.
४. प्रत्येक मोबाइललाअसलेल्या डेटा सेव्हिंग मोडचा वापर करून ठराविक डेटा लिमिट सेट करता येते. त्यामुळे सेट केलेले डेटा लिमिट संपल्यानंतर नोटिफिकेशन येतं. त्यानंतर तुम्हाला आवश्यक वाटल्यास उरलेला डेटा वापरता येतो.
५. ट्विटरच lलाईट अँप वापरल्याने इंटरनेट डेटा कमी लागतो.
६. फेसबूक आणि फेसबुक मेसेंजर साठी देखील पर्यायी अँप म्हणून फेसबुक लाईट हे तुम्ही वापरू शकतात . यावर तुम्हाला फेसबुक मेसेजही करता येतात. शिवाय डेटासुद्धा कमी जातो
मोबाईल चार्जिंग जास्तवेळ टिकवायचं !
१. मोबाईलमध्ये अनेक अशी अप्स असतात जी आपण वापरून झाल्यावर बंद न करता डायरेक्ट बॅक बटन मारतो. ती अप्स बॅकग्राउंडला सुरुच असतात. यामुळे बॅटरीचा वापर होत असतो. अशावेळी बॅकग्राउंड अप्स वेळोवेळी क्लिअर केली तर बॅटरीचा वापर कमी होतो.
२. फोनच्या बॅटरी सेव्हिंगसाठी डार्क मोड वापरून बॅटरी सेव्ह करता येईल. यामुळे तुमच्या डोळ्यांवर येणारा ताणही कमी होईल.
३ ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस काम संपल्यानंतर बंद केल्यास बॅटरीचा वापर कमी होतो.
४. . मोबाईलमध्ये बॅटरी सेव्हर पर्याय असतो. फोन वापरात नसेल तेव्हा बॅटरी सेव्हर ऑन केल्यास फायदा होतो.
५. बॅटरी वाचवण्यासाठी स्क्रीन डिस्प्लेसाठी टायमर सेट करावे. ज्यामुळे ठराविक वेळेत तुम्ही स्क्रीनवर टॅप नाही केलंत तर स्क्रीन बंद होईल. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले सेटिंग ओपन करा. यात असणारा ऑलवेज ऑन डिस्प्ले पर्याय टर्न ऑफ करा. त्यात असणारा काही सेकंद ते मिनिट असा पर्याय तुम्हाला मिळेल त्यानुसार डिस्प्ले किती वेळेत बंद व्हावा तेवढं सेट करता येईल.
लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )