Friday, May 3, 2024
Homeनगरगृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

मुंबई /नागपूर:- नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे.त्या पासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे. अशा सुचना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

शनिवार दि.३० सायंकाळच्या सुमारास या टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपुर, गणेशपुर, शेकापुर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली.
तसेच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जेणेकरून टोळधाडी
पासून शेतकऱ्यांचे पीक,

- Advertisement -

फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो. असे श्री. देशमुख म्हणाले.

नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या