Friday, May 3, 2024
Homeनाशिकअडीच हजार नाही, १ हजार रुपयांत होणार एचआरसिटी स्कॅन

अडीच हजार नाही, १ हजार रुपयांत होणार एचआरसिटी स्कॅन

नाशिक | Nashik

नागरिकांच्या सोयीसाठी मनच्यावतीने बिटको हॉस्पिटल लावण्यात आलेली सिटीस्कॅन मशिन मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याहस्ते महारााष्ट्र दिनी कार्यान्वित करण्यात आली यावेळीी आयुक्तांन येथील कामकाजाचा आढावाही घेतला.

- Advertisement -

नाशिक शहर व परिसरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विविध पातळीवर कामकाज करत असताना रूग्णांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने भर दिला जात आहे.

या अनुषंगाने बिटको रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन बसवण्यात आलेले असून, त्याठिकाणी रेडिओलॉजिस्ट नेमणूक करण्यात आली आहे.सिटीस्कॅन मशिन नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आली असून.या सिटीस्कॅन मशिन द्वारे एच. आर. सि.टी. चेस्ट प्रती चाचणीचे दर मनपाने निश्चित केले आहेत.

मनपा अंतर्गत दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता एक हजार रुपये व इतर खाजगी दवाखाने,रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांना रुग्णांकरिता एक हजार पाचशे रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील रुग्णालयात नातेवाईकांकडून दवाखान्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या होत्या.

सूचनांच्या अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी पाहणी केली.तसेच तेथील रुग्णांना औषध उपचार, नाष्टा,जेवण, चहापान आदींची व्यवस्था योग्य रीतीने होत आहे की नाही याबाबत सविस्तर आढावा घेऊन सुरक्षे बाबत कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागास व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

त्यावेळी यांच्या समवेत विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर,कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ.जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या