Friday, May 3, 2024
Homeजळगावमहिला दिनी नूतनच्या विद्यार्थींनीना मिळाल्या नेतृत्व विकासाच्या टिप्स

महिला दिनी नूतनच्या विद्यार्थींनीना मिळाल्या नेतृत्व विकासाच्या टिप्स

जळगाव jalgaon

जागतीक महिला दिनी (World Women’s Day) नूतन मराठा महाविद्यालयाच्या (Nutan Maratha College) विद्यार्थीनींना नेतृत्व विकासाबाबतच्या (Leadership development) टिप्स मिळाल्यात. नूतन मराठा महाविद्यालय आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय युवती नेतृत्व कौशल्य कार्यशाळा (Young Leadership Skills Workshop) चे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 7 ते 9 मार्च या कालावधीत तीन दिवसीय युवती नेतृत्व कौशल्य कार्यशाळा (Young Leadership Skills Workshop) चे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 7 मार्च रोजी उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट (Heartfulness Education Trust) च्या डॉ. नीलम अग्रवाल, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख तसेच संयोजिका डॉ. इंदिरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेचा प्रारंभ झाला.

जीवन जगतांना ते हलकं आणि फुलकं कसं जगायचं, आपल्यातील नेतृत्वगुणाचा कसा विकास करायचा या संदर्भात विद्यार्थ्यांना टीप्स देवून डॉ. नीलम अग्रवाल (Dr. Neelam Agarwal) यांनी ध्यान धारणेतून एकाग्रता कशी निर्माण करावी हे शास्त्रीय दृष्ट्या स्पष्ट करत विद्यार्थ्यांकडून ध्यान देखील करवून घेतले. युवा हार्टफूलनेस कार्यकर्ता अपूर्वा अग्रवालने रिलॅक्सेशन टेक्निक शिकवली.

कार्यशाळेचा दुसर्‍या दिवशी आयुर्वेद व क्युपंचर तज्ञ डॉक्टर नीलम अग्रवाल आणि त्यांची कन्या अपुर्वा या दोन्ही मायलेकींनी सभागृहातील सगळ्यांनाचBrain च्या cognitive skill development साठी Brighter minds excercises करवून घेतल्या. तसेच cleaning, meditation यांच्या माध्यमातून conect with self या संकल्पनेशी जोडत तणावमुक्त करून सुखद आणि अपुर्व असा अनुभव देत आठ मार्च निमित्ताने आठवणीत राहणारी मेजवानी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांनी स्री (Women) ही नात्याची वीण घट्ट करणारी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी शक्ती आहे, असा गौरव करत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या महिला दिनाचे तसेच महिलांनी महिलांसाठी म्हणजेच डॉ. नीलम अग्रवाल आणि त्यांची कन्या अपुर्वा अग्रवाल यांनी हाती घेतलेल्या या कार्याचेही कौतुक करत अध्यक्षीय समारोप केला..

महिला दिन (Women’s Day) आठ मार्च रोजीच का साजरा करण्यात येतो? याच्यामागील पार्श्र्वभूमी कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ इंदिरा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केली.

मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी आभार मानले तर सुत्रसंचलन डॉ इंदिरा पाटील यांनी केले.

कार्यशाळेच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे बुधवार 9 मार्च रोजी युवतींना आपले स्वतःचे पिक परफॉर्मन्स (Performance) देण्यासाठी, सर्वोत्तम घडण्यासाठी, निर्णय घेताना कसे घ्यावे आणि समाजात आपल्या वतीने काय देता येईल, याविषयी सेशन बरोबर ध्यानामध्ये प्रार्थनेचे महत्त्व विशद करुन ध्यान सत्र घेण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी विद्यार्थीनींसह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या