Friday, May 3, 2024
Homeनगरइच्छुक उमेदवारांच्या आशा भंगल्या

इच्छुक उमेदवारांच्या आशा भंगल्या

जामखेड (तालुका प्रतिनिधी)-

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत

- Advertisement -

निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत पार पडली. तहसील कार्यालयासमोर लहान मुलांच्या हातांनी चिठ्ठ्या काढून सर्व आरक्षण जाहीर केले.

यामध्ये प्रभाग 1 सर्वसाधारण व्यक्ती, 2 सर्वसाधारण महिला, 3 सर्वसाधारण व्यक्ती, 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, 5 सर्वसाधारण महिला, 6 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 7 सर्वसाधारण महिला, 8 अनुसूचित जाती महिला, 9 सर्वसाधारण व्यक्ती, 10 सर्वसाधारण महिला, 11 सर्वसाधारण व्यक्ती, 12 सर्वसाधारण व्यक्ती, 13 सर्वसाधारण महिला, 14 अनुसूचित जाती व्यक्ती, 15 नागरिकांचा मागास प्रवर्ग, व्यक्ती 16 सर्वसाधारण व्यक्ती, 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, 18 सर्वसाधारण महिला, 19 सर्वसाधारण महिला, 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 21 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अशा प्रकारे आरक्षण सोडत प्रांताधिकारी नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली.

यावेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर आबा राळेभात, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात पाटील, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार, अमित जाधव, नगरसेवक गणेश आजबे, उमरभाई कुरेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, विकी सदाफुले, नासीर सय्यद, युवा नेते महेश राळेभात, अमोल गिरमे, गणेश राळेभात, कुंडल राळेभात, आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

नगरपरिषदेच्या आरक्षणामुळे अनेक जुन्या इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा भंगल्या असून अनेक युवा कार्यकर्त्यांच्या नवीन आरक्षणामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. ऐन थंडीत जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या