Tuesday, September 8, 2026
Homeनगरबिबट्याने घेतला चिमुरड्याचा बळी

बिबट्याने घेतला चिमुरड्याचा बळी

श्रीरामपूर-राहाता सीमेवरील चितळीतील घटना, वनविभागाबद्दल संताप

चितळी | Chitali

अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागाविषयी संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर-राहाता सीमेवरील चितळी येथे मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकांवर घरा शेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व मंडळी बिबट्याच्या दिशेने धावले.

मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मकात शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले.यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

७२ वर्षांत पहिल्यांदाच दिल्लीबाहेर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; गुजरातची निवड, विरोधकांकडून सवाल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारतीय सिनेसृष्टीत मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2026) हा सोहळा गेल्या 72 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा...