Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रWalmik Karad : मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तीन दिवसांपासून…, नेमकं...

Walmik Karad : मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तीन दिवसांपासून…, नेमकं काय झालं?

बीड । Beed

बहुचर्चित मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती कारागृहात खालावल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली असून, सध्या कारागृहातच त्याच्यावर सलाईन लावून प्राथमिक वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीने कारागृहात जाऊन आरोपीची तपासणी केली. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याला ‘युरोसिसटायटीस’ प्रकारचा संसर्ग (Infection) झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र, दुर्दैवाने बीड जिल्हा रुग्णालयात या विशिष्ट आजारावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू झाल्या आहेत.

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर या संसर्गावर वेळेत योग्य ते उपचार झाले नाहीत, तर इन्फेक्शन वाढून थेट यकृतावर (Liver) त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच कारागृह प्रशासन आणि आरोग्य विभाग सध्या पूर्णपणे सतर्क झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराडची प्रकृती अचानक ढासळली होती. त्यावेळी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र विविध चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा कारागृहात पाठवून तिथेच उपचार सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच, आता मुख्य आरोपीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे बीडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...