Thursday, October 8, 2026
Homeनाशिकविल्होळीत बिबट्याचा धुमाकूळ; बंगल्यातील श्वानाचा पाडला फडशा

विल्होळीत बिबट्याचा धुमाकूळ; बंगल्यातील श्वानाचा पाडला फडशा

नवीन नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहराला लागून असलेल्या विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा आढळून आला असून, गुरुवारी पहाटे बंगल्याच्या दाराजवळ झोपलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. हल्ल्‌‍याची घटना घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

PM Narendra Modi On Nana Patekar Death: नाना पाटेकर गेले पण त्यांचा आवाज घुमत राहिल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं खास वैशिष्ट्य

- Advertisement -

विल्होळी येथील शेतकरी दामोदर थोरात यांचा शेतातच बंगला आहे. गुरुवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास बिबट्या बंगल्याच्या परिसरात आला. दाराजवळ झोपलेल्या श्वानावर त्याने अचानक झडप घातली. या हल्ल्‌‍यात कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्या शेताच्या दिशेने निघून गेला. बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्हीत बिबट्या स्पष्टपणे दिसत असल्याने परिसरात त्याचा वावर असल्याचे पुन्हा समोर आले आहे. बिबट्याने थेट शेतातील बंगल्यापर्यंत येऊन हल्ला केल्याने शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी व शेतमजुरांना पहाटे आणि रात्री शेतात जावे लागत असल्याने त्यांच्यात भीती वाढली आहे. दरम्यान, वन विभागाने घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरा बसवावा आणि बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Pothole News : कामासाठी खोदलेला खड्डा ठरला जीवघेणा! ६१ वर्षीय...

0
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) पार्श्वभूमीवर शहरभर सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी रस्ते खोदले जात असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....