Thursday, March 13, 2025
Homeनगरपिंपरी निर्मळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला 'असं' केलं रेस्क्यू

पिंपरी निर्मळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला ‘असं’ केलं रेस्क्यू

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्तीमध्ये सोमवारी रात्री दिलीप भुसाळ यांच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत वस्ती परिसरात बिबट्याने हल्ले करून अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आणि कालवडी ठार केल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वन विभागाने कोणताही पिंजरा उपलब्ध केलेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी संदीप भुसाळ यांनी केली आहे.

सोमवारी रात्री दिलीप भुसाळ यांच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. ही घटना लक्षात येताच दिलीप भुसाळ, संदीप भुसाळ, गोरक्ष निर्मळ आणि अनिल निर्मळ यांनी वन विभागाला माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी कॅरेटच्या साहाय्याने पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून मुक्त केले. मात्र, परिसरात अजूनही मादी बिबट्या आणि दोन पिल्ले फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पिंपरी गावाच्या विविध भागांत बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात काम करत असल्याने तसेच शाळा सुरू झाल्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांमध्ये चिंता आहे. शिकारीच्या शोधात असलेले बिबटे खुलेआम फिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

भुसाळ वस्तीच्या जवळच प्रसिद्ध वरद विनायक सेवाधाम आणि बिरोबा लवण वस्ती आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण आणि रहिवासी असल्याने बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांची चिंता वाढत असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी संदीप भुसाळ आणि ग्रामस्थांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...