Sunday, July 26, 2026
Homeनगरभक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

राहाता (तालुका प्रतिनिधी)

अस्तगाव येथील ३५ चारी परिसरात शुक्रवारी रात्री एका बिबट्याची विहिरीत पडल्याची घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबट्या सुमारे १२ तास विहिरीच्या पाण्यात अडकला होता. स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.

- Advertisement -

अस्तगावमधील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या रात्री सुमारे २ ते २.३० च्या सुमारास पडला असावा, असा अंदाज आहे. विहिरीमध्ये चांगले पाणी असल्याने बिबट्याने काही काळ पाण्यात पोहून स्वतःला सावरले. सुदैवाने, त्याला विहिरीतील एका पाईपचा आधार मिळाला, ज्यामुळे तो पुढील दोन्ही पायांनी पाईप धरून रात्रभर पाण्याबाहेर राहू शकला.

विहिरीत पडण्यापूर्वी या बिबट्याने जवळच असलेल्या बिडवे यांच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कळपातील एक कोकरू बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर हा बिबट्या एका कुत्र्याचा पाठलाग करत होता. पाठलाग करताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात पडला.

विहिरीलगत शेख यांची वस्ती आहे. रात्रीच्या वेळी विहिरीतून काहीतरी आवाज येत असल्याचे वस्तीतील सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित विहिरीचे मालक कुलकर्णी यांना याची कल्पना दिली. कुलकर्णी आणि परिसरातील रहिवाशांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता, त्यांना पाईपला बिलगलेला बिबट्या दिसून आला. बिबट्या विहिरीत असल्याची माहिती मिळताच कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल चौधरी यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य आणि पिंजरा आणला.

वनविभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयाने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला पिंजऱ्यात येण्यासाठी प्रवृत्त केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात आला आणि त्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याचे प्राण वाचले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Eknath Shinde : राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात…; DCM शिंदेंचा गंभीर...

0
मुंबई | Mumbai ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. अखेर विद्यार्थी आंदोलनाचा वाढता...