Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसंसरीत बिबट्याची दहशत

संसरीत बिबट्याची दहशत

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

दारणाकाठी ऊसतोड सुरू झाल्याने बिबटे पुन्हा नागरी वस्तीकडे फिरकत आहेत. गेल्या चार दिवसांपासून संसरी येथे बिबट्याने मुक्काम ठोकला असून पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले जात आहे. दरम्यान, वनविभागाने आज येथे पिंजरा लावला असून बिबट्या केव्हा जेरबंद होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

काल रात्री दोन वाजेच्या सुमारास संसरी-शेवगेदारणा मार्गावरील श्री भैरवनाथ महाराज पुलावरून बिबट्या संसरी गावात घुसल्याचे बाळासाहेब गोडसे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ग्रामस्थ व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला माहिती दिली व गावात तसेच परिसरात पेट्रोलिंग करण्यास पोलिसांना सांगण्यात आले.

पोलिसांनी सदरची माहिती पोलीस कंट्रोल रूममार्फत वनविभागालादेखील कळवली. यामुळे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास वनविभागाचे सेवक व पोलीस बिबट्याच्या शोधासाठी संसरी गावात दाखल झाले. मात्र बिबट्या दिसून आला नाही. तीन दिवसांपूर्वी विजय गोडसे यांच्या पाळीव कुत्र्याचा या बिबट्याने फडशा पाडला.

दरम्यान, सरपंच विनोद गोडसे यांनी बिबट्याची वाढती दहशत लक्षात घेता या ठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वन परिमंडल अधिकारी अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनखाली सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वनरक्षक गोविंद पंढरे यांनी येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील नाल्यात पिंजरा लावला. यावेळी सरपंच विनोद गोडसे, राजेश गोडसे, अमोल गोडसे, बाळासाहेब गोडसे, शाम गोडसे, विजय गोडसे, प्रमोद गोडसे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या