Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतळेगाव दिंडोरीत बिबट्याची दहशत

तळेगाव दिंडोरीत बिबट्याची दहशत

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

ओझे l विलास ढाकणे Oze

तळेगाव दिंडोरी आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून शेतकऱ्यांनी कंपाउंड केले मात्र आता थेट कंपाउंड ओलांडत थेट घर, गोठा, पडवी परिसरात प्रवेश करून पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी कांतीलाल घुगे यांच्या पॉलिहाऊसमध्ये बिबट्या घुसल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती पसरली. त्यानंतर संदीप चौधरी यांच्या घराजवळील कंपाउंडवर बिबट्याने उडी मारून कुत्रा उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फक्त तळेगावच नव्हे तर वणारवाडी, दिंडोरी येथेही बिबट्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय युवतीची ,4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, “आता अजून किती बळी जाणार?” असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि ग्रामस्थांच्या जीवितसुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज’ला मुदतवाढ; सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविण्याची नवोन्मेषकांना आणखी...

0
नाशिक | १० सप्टेंबर २०२६:जिमाका वृत्तसेवा सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या नियोजनात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा प्रभावी वापर करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त...