जळगाव jalgaon प्रतिनिधी
ग्रंथालयशास्त्र (Library science) हा विषय आंतरविद्या शाखीय असल्याने या विषयाचा संबंध इतर विषयांशी सतत येतो. हा विषय इतर शाखेच्या विद्यार्थाना (Student) जोडण्याचा दुवा आहे. त्यामुळे या विषयाशी जुळणारा विद्यार्थी आत्मनिर्भर (Self-reliant) व्हावा या अनुषंगाने शैक्षणिक अभ्यासक्रम (syllabus) तयार करावा असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद (Management Council) सदस्य(Member) दिलीप रामू पाटील (Dilip Ramu Patil) यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (North Maharashtra University) ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागातर्फे (Library and Informatics) आयोजित ‘बी.लिब (‘B.Lib) आणि एम.लिब (M.Lib) अभ्यासक्रम निर्मिती ‘ या विषयावर विद्यापीठस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे (Online workshops) उद्घाटन झुम अप या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी श्री.पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. बी. व्ही. पवार होते. यावेळी आंतरविद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य प्रा डॉ अशोक राणे यावेळी उपस्थित होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले, कल्पना, कर्म व करुणा या तीन बाबी शैक्षणिक अभ्यासक्रम (syllabus) तयार करताना लक्षात घेतल्यास शिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थी (Student) हा आत्मनिर्भर (Self-reliant) होऊ शकतो. ग्रंथालयशास्त्र विषयाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरक असून त्यांना आत्मनिर्भर बनविणारे आहे त्यामुळे या शिक्षणाचा (education) उपयोग विद्यार्थी उत्तम ग्रंथपाल (Librarian) होणे साठी निश्चित करतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रभारी प्र-कुलगुरु (Vice Chancellor) प्रा. बी. व्ही. पवार (prof. B. V. Pawar) म्हणाले की, सक्षम विद्यार्थी (Student) घडविणे हे कोणत्याही अभ्यासक्रमाचे प्रथम उद्दिष्ट असते त्यामुळे ग्रंथालय शास्त्राचा अभ्यासक्रम तयार करताना तो दर्जेदार आणि उद्दिष्टपूर्तीचा असावा. अभ्यासक्रम निश्चिती संदर्भात विद्यापीठ आणि युजीसी (UGC) चे धोरण अभ्यासक्रम (syllabus) समितीने लक्षात घ्यावे अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
आंतरविद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य प्रा डॉ अशोक राणे (Prof. Dr. Ashok Rane) यांनी देखील यावेळी मार्गदर्शनपर सूचना यावेळी केल्या. जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर उपस्थित होते.
प्रास्ताविक ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. डॉ. अनिल चिकाटे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. विनोद निताळे यांनी मानले. कार्यशाळेची तांत्रिक बाजू डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांभाळली.




