Friday, May 3, 2024
Homeनाशिकबेशुद्ध सापाच्या पिल्लाला 'असे' दिले जिवदान

बेशुद्ध सापाच्या पिल्लाला ‘असे’ दिले जिवदान

नाशिक । Nashik

बेशुद्ध सापाच्या पिल्लाला सर्परक्षक विशाल बाफना यांनी जिवदान दिले.

- Advertisement -

पंचवटीतील मखमलाबाद रोड येथील भावबंधन मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर गाडीत साप शिरला असता जमलेला तोतया तज्ञाच्या सल्ल्याने गाडीवर फिनाईल शिंपडण्यात आले.

त्यामुळे गाडीत शिरलेला धामण जातीच्या बिनविषारी सापाचे पिल्लू त्या फिनाईलच्या वासाने गुदमरल्या नंतर साधारण दहा पंधरा मिनिटांनी बाहेर आले पण ते बेशुद्ध झाले.

तोपर्यंत सर्परक्षक विशाल बाफना तिथे पोहाेचले त्यांनी तात्काळ त्या सापाच्या पिल्लाला व्यवस्थितपणे ताब्यात घेऊन, नाशिकमधील ज्येष्ठ सर्पअभ्यासक मनिष गोडबोले यांना सागितले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार धामणच्या पिल्लूच्या शरीरातील फिनाईलची दूषित हवा एका प्लास्टिक स्ट्रॉच्या साहायाने काढून शुद्ध ऑक्सीजनचा पुरवठा करून त्याला वाचवले. याची वनविभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात साेडुन दिले.

सर्पक्षेत्रातील जाणकारांनी नागरिकाना विनंती केली की, अशा अर्धवट ज्ञानाच्या आहारी न जाता जोपर्यंत त्यातला जाणकार येत नाही. तोपर्यंत कोणतीही चुकीची कृती करू नये. यात त्या प्राण्याच्या किंवा त्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. या याबद्दल उपस्थित नागरिकांनी सर्पमित्र बाफना यांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या