Monday, November 2, 2026
HomeनगरAhilyanagar : 80 लाखांच्या कर्जापोटी 1.29 कोटींची वसुली

Ahilyanagar : 80 लाखांच्या कर्जापोटी 1.29 कोटींची वसुली

अतिरिक्त पैशांसाठी व्यावसायिकाला मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

व्यवसायासाठी घेतलेल्या 80 लाख रूपयांच्या कर्जापोटी व्याजासह तब्बल एक कोटी 29 लाख रूपये परत करूनही अतिरिक्त पैशांची मागणी करत व्यावसायिकाचा छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पैशांच्या वादातून व्यावसायिकाला शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवून शहराबाहेर नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर सानप, अश्विनी सानप, संगीता सानप (मयत) आणि प्रल्हाद खाडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत गणेश माणिक फुंदे (वय 42, रा. उल्हासनगर, जि. ठाणे, मुळ रा.नारायणडोहो, ता. अहिल्यानगर) यांनी शनिवारी (31 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फुंदे आणि त्यांचा मित्र योगेश भिसे यांनी किशोर सानप याच्याकडून व्यवसायासाठी 80 लाख रूपये व्याजाने घेतले होते. फुंदे यांनी मुद्दल व व्याजापोटी एकूण एक कोटी 29 लाख रूपये किशोर सानप आणि त्याची पत्नी अश्विनी सानप यांच्या खात्यांवर जमा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, आतापर्यंत दिलेली रक्कम ही केवळ व्याजापोटी असल्याचे सांगून किशोर याने आणखी पैशांची मागणी सुरू केली. किशोर आणि अश्विनी हे उल्हासनगर येथील फुंदे यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी व्यवहारातील सर्व पैसे परत करण्याची मागणी करत, गावाकडील जमीन आणि फ्लॅट विकून पैसे देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर 17 आणि 18 मार्च रोजी सानप दाम्पत्याने नारायणडोहो येथील फुंदे यांच्या घरासमोर जाऊन त्यांनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत आरडाओरड केला. त्यामुळे नातेवाइकांमध्ये बदनामी झाल्याचे फुंदे यांनी म्हटले आहे.

20 मार्च 2023 रोजी किशोर आणि अश्विनी हे पुन्हा फुंदे यांच्या घरी गेले. व्यवहार मिटविण्यासाठी नोंदणी कार्यालयात येण्यास सांगितले. अन्यथा गावात बदनामी करण्याची धमकी दिल्याने फुंदे यांच्यासह त्यांचे आई-वडील यांना वाहनातून अहिल्यानगर येथील पराग बिल्डिंग परिसरातील नोंदणी कार्यालयात गेले. तेथे किशोर, अश्विनी यांच्यासह संगीता सानप आणि प्रल्हाद खाडे हेही उपस्थित होते. फुंदे यांच्या आई-वडिलांनी वडिलोपार्जित जमीन सानप यांच्या नावावर करण्यास नकार दिल्यानंतर चौघांनी फुंदे यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करत नगर-पाथर्डी रस्त्याने चांदबीबी महालाच्या दिशेने अज्ञातस्थळी नेण्यात आले. जमीन विकून पैसे आणण्यास सांगत, पैसे मिळेपर्यंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एल अँड टी कंपनीच्या कॅन्टीनचा परवाना रद्द

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसी परिसरातील एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता, सडलेला भाजीपाला आणि मुदतबाह्य कच्चा माल आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीनचा परवाना...