राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5,500 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याची (Onion) 2,225 गोण्यांची आवक झाली. कांदा प्रतवारीनुसार नंबर एकच्या कांद्याला (Onion) 4,100 ते 5,500 रुपये, नंबर दोनच्या कांद्याला 2,500 ते 4,000 रुपये, तर नंबर तीनच्या कांद्याला (Onion) 1,000 ते 2,450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1,500 ते 4,000 रुपये, तर जोड कांद्याला (Onion) 800 ते 1,700 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 2,044 क्रेट्स आवक झाली. डाळिंबाच्या पहिल्या प्रतवारीला 121 ते 205 रुपये, दुसर्या प्रतवारीला 91 ते 120 रुपये, तिसर्या प्रतवारीला 51 ते 90 रुपये, तर चौथ्या प्रतवारीला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. सीताफळाची 67 क्रेट्स आवक झाली. त्याला 20 ते 70 रुपये, तर सरासरी 50 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. पेरूची 74 क्रेट्स आवक झाली असून, त्याला 5 ते 40 रुपये आणि सरासरी 25 रुपये भाव मिळाला. संत्र्यांची 37 क्रेट्स आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




