अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 37-अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखेपाटील यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये चेकींग अॅण्ड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी-मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएमम बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे चुकीचे वृत्त शनिवारी माध्यमांवर झळकले. यामुळे काही काळ खळबळ उडाली. मात्र, न घडेल्या या वृत्ताबाबत शनिवारी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे खुलासा करण्यात आला आणि अखेर प्रकरणावर पडदा पडला.
शनिवारी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार डॉ. विखे पाटील यांचा अर्ज निवडणूक आयोगाने निकाली काढल्याचे वृत्त सोशल मीडियासह अन्य ठिकाणी झळकले. यामुळे नगर दक्षिणेसह जिल्ह्यात सर्व कानोसा घेण्यास सुरूवात झाली. दरम्यान, हे प्रकरण फेक असून त्यात तथ्य नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशिर प्रक्रिया सध्या सुरू असून सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे.
चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी/मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएमम बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.