Friday, May 3, 2024
Homeराजकीयलोणी : भाजपने केली विज बीलांची होळी

लोणी : भाजपने केली विज बीलांची होळी

लोणी | वार्ताहर | Loni

सध्या राज्यात वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलंचा तापल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन केले.

- Advertisement -

यावेळी आ.विखे यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते बोलतांना म्हणाले, वाढीव वीज बिल केवळ भाजपाच्या आंदोलनाचा विषय नाही तर वाढीव विज बिलाविरोधात रोष व्यक्त करत राज्यातील जनता देखील रस्त्यावर उतरली आहे.स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मागच्या सरकारवर केवळ दोषारोप सुरु आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी असल्याची टीका विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. वाढीव वीज बिलावरुन राज्यात वणवा पेटलेला आहे. सरकारने आम्हाला फसवलंय, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. लॉकडाऊन काळात सरकारने 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकारकडे कुणीही मोफत वीज देण्याची मागणी केली नव्हती. मात्र सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याच्या नादात सरकारने घोषणा केली पण ज्या घोषणेची अंमलबजावणी होणार नाही, अशी घोषणा केली. सरकारने आता कोणत्याही परिस्थितीत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विखे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या