Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरात मॉडेलची स्थिती बघा! : नवाब मलिक यांचा भाजपला सल्ला

गुजरात मॉडेलची स्थिती बघा! : नवाब मलिक यांचा भाजपला सल्ला

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

राज्यातील कोरोनाच्या स्थितीवरून आघाडी सरकारला दूषणे देणाऱ्या भाजप नेत्यांनी गुजरात मॉडेलची स्थिती बघावी, असा सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये रुग्णालयाअभावी लोक मरत आहेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यावरून सत्ताधारी आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला नवाब मलिक यांनी सोमवारी उत्तर दिले.

भाजपशासित त्तरप्रदेशमध्ये रामभरोसे कारभार सुरू आहे. चाचण्या तर होतच नाही. आरटीपीसीआर केली जाई नाही. अन्टीजेन चाचणीत ८० टक्केही अचूकता नाही. युपी सरकारने योग्यप्रकारे टेस्टींग केल्या तर वेगळी परिस्थिती होवू शकते, असेही नवाब मलिक म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात इथून निघताना मजुरांनी राज्य सरकार जिंदाबाद… मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. परंतु तिथे गेल्यावर लोकांनी भाजपचा मुर्दाबाद केला हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या