Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशभारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंंतप्रधान; पंतप्रधान मोदींकडून अनोख्या शुभेच्छा

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंंतप्रधान; पंतप्रधान मोदींकडून अनोख्या शुभेच्छा

दिल्ली | Delhi

ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या रुपाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाची (Indian Origin) व्यक्ती विराजमान होणार आहे. सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक यांची निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला.

- Advertisement -

ऋषी सुनक यांनी टोरी लीडरशीपमध्ये पेनी मॉर्डंट यांना मागलं टाकत पंतप्रधानपद मिळवलं. त्यांना १८० हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला होता. पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं सुनक यांचा मार्ग सुकर झाला.

दिवाळीच्यामुहूर्तावर पहिले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने ब्रिटेनसह भारतातत देखील मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय राजकीय मंडळी, सिनेअभिनेते तसेच सर्व सामान्यांकडून ब्रिटेनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट (PM Modi) करत ऋषी सुनक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले, पंतप्रधान सुनक यांच्या सोबत जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यासाठी आणि रोडमॅप २०३० ची अंमलबजावणी करण्यास भारत उत्सुक आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याने भारत-ब्रिटेन ऐतिहासिक संबंधांचं आधुनिक भागीदारीत रूपांतरित होईल असं पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीट मधून व्यक्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या