Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्याझाडाला गळफास घेत प्रेमी युगलाची आत्महत्या

झाडाला गळफास घेत प्रेमी युगलाची आत्महत्या

सोलापूर | Solapur

- Advertisement -

येथील कवठे गावात (Kavathe village) एकाच झाडाला गळफास घेत युवक-युवतीने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरज चव्हाण असे आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय युवकाचे नाव असून तो मोहोळ तालुक्यातला रहिवासी आहे. तर मृत मुलगी ही मोहोळ तालुक्यात (Mohol taluka) असलेल्या आपल्या मामाच्या गावी मागील वर्षी सुट्टीत गेली होती. त्यावेळी सुरज सोबत तिचे प्रेमाचे सूत जुळले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

मात्र घरच्यांचा त्यांच्या या प्रेमसंबंधाला विरोध असल्याची माहिती समोर आली. तसेच कुटुंबियांच्या विरोधानंतरही ते दोघेही कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर आज या दोघांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

… तर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार? आमदार रोहित पवारांना विद्यार्थ्यांचा सवाल

दरम्यान, ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना (Police)घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग, एक दुचाकी आढळून आली. तसेच गळफास काढून पोलिसांनी दोघांनाही सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर या घटनेप्रकरणी सिविल हॉस्पिटल पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Video : दोन एकर कांदा पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....