Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"पप्पा तुम्ही तरी कुठे कलेक्टर झाला? शिक्षकच झालात"; संतापलेल्या पित्याच्या मारहाणीत मुलीचा...

“पप्पा तुम्ही तरी कुठे कलेक्टर झाला? शिक्षकच झालात”; संतापलेल्या पित्याच्या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली | Sangli
बारावीच्या चाचणी परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या बापानेच पोटची लेक साधना (वय १७) हिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. साधना धोंडीराम भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी साधना ही आटपाडीत बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. दहावीत तिने ९२.६० टक्के गुण मिळवले होते. गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या. यामुळे तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे प्रयत्न सुरु होते. पण बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ते संतापले.

- Advertisement -

धोंडीराम भोसले नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षत असून, पत्नी प्रिती गावच्या माजी सरपंच आहेत. धोंडीराम यांनी शुक्रवारी घरी आल्यानंतर मुलगी साधनाला कमी गुण मिळाल्याचे कारण विचारले. मी तुझ्यासाठी इतका खर्च करतोय? तू कशी डॉक्टर होणार? असा जाब त्यांनी विचारला. यादरम्यान साधनानेही त्यांना उलट उत्तर देत, ‘पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते. तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात’ असे म्हटले. मुलीने उलट उत्तर दिल्याने धोंडीराम चिडले आणि दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली.

YouTube video player

धोंडीराम यांनी मुलीच्या पोटात लाथाही मारल्या. पत्नीने मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले होते. पण काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण केली. या मारहाणीत तिला गंभीर इजा झाल्या होत्या. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता घटना उघडकीस आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. साधनाची आई प्रिती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धोंडीराम भोसलेंना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली...