Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशलक्ष्मीपूजनाच्या दिवशी महागाईचा फटका! LPG गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवीन दर?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महागाईचा फटका! LPG गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवीन दर?

मुंबई । Mumbai

सध्या भारतात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. काल देशात नरक चतुर्दशी चा सण साजरा झाला आणि आज लक्ष्मीपूजनाचा सण साजरा होणार आहे. दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे.

- Advertisement -

आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. सणासुदीच्या काळात व्यावसायिक सिलिंडर महाग झाल्यामुळे आता नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

तेल कंपन्यांनी लागू केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) दरांमध्ये ६२ रुपयांची वाढ झाली आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी १४ किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील चार महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये १५० रुपयांहून जास्त वाढ झालीय. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १५६ रुपयांनी तर मुंबईत १५६.५ रुपयांनी वाढ झालीय. मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

परंतु व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील जेवणाच्या किंमतीवर नक्की परिणाम होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यापासून घरगुती सिलिंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मार्च अखेरीस शंभर रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर दरवाढ झालेली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...