कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील मढी खुर्द (Madhi Khurd) गावात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ललित आप्पासाहेब आभाळे या तरुणाचा मृतदेह (Youth Deadbody) त्यांच्या स्वतःच्या घरासमोरील विहिरीत (Well) आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ललित हा रविवारी 7 डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी व गावकर्यांनी शोधाशोध सुरू केली. तो कुठेही सापडत नसल्याने अखेर बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) नोंदवण्यात आली होती.
मंगळवार 9 डिसेंबर रोजी ग्रामस्थांना घरासमोरील विहिरीत (Well) ललितचा मृतदेह तरंगत्या स्वरूपात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विहिरीतून मृतदेह (Dead Body) बाहेर काढला आणि पुढील तपासासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान या घटनेमुळे आभाळे कुटुंबियांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तरुणाच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. हा अपघात आहे की आत्महत्या, याबाबत अधिक चौकशी केली असता, ललित 12 वी शिक्षण घेत होता. वडिलांनी त्याला म्हणाले की जास्त मोबाईल पाहू नको, याचा राग येऊन त्याने विहिरीत उडी मारल्याचे समजते. या घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) गुन्हा नं. बी.एन.एस. 137/2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री. दहीफळे करत आहेत.




