Saturday, August 22, 2026
HomeनगरPathardi : मढी येथील गाळ्यांप्रकरणी माजी अध्यक्षांवर आरोप

Pathardi : मढी येथील गाळ्यांप्रकरणी माजी अध्यक्षांवर आरोप

कानिफनाथ देवस्थानच्या सभागृहात विश्वस्त मंडळाची पत्रकार परिषद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मढी देवस्थानचे माजी अध्यक्ष संजय मरकड यांच्या सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडिओमधून देवस्थानचे गाळे मुस्लिमांना भाड्याने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुस्लिम विश्वस्तांच्या नातेवाईकांना गाळे दिले असावेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांना सध्याच्या देवस्थान विश्वस्त मंडळाने सोमवारी (दि.9) पत्रकार परिषदेत उत्तर देत नाव न घेता माजी अध्यक्षांवर पलटवार केला. देवस्थानच्या गाळ्याबाबत माजी अध्यक्ष दिशाभूल करत असून ज्या गाळ्यांबाबत आरोप करत आहेत आहेत ते गाळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच त्यांच्या स्वाक्षरीने करारनामे करून देण्यात आले असून त्या करारांची मुदत जून 2026 पर्यंत असल्याचा दावा करत विश्वस्तांनी पुरावे देत कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली.

- Advertisement -

श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या विश्वस्तांनी माजी अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे करारनाम्यांचे लिखित पुरावे पत्रकारांसमोर सादर केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, सचिव माधुरी मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, विश्वस्त उषा मरकड, उत्तम मरकड, अनिल साठे, मदन मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक मरकड तसेच व्यवस्थापक संजय मरकड उपस्थित होते.
विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे की, त्यांनी जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारला आणि अद्याप कोणत्याही गाळ्यांचा करारनामा केलेला नाही. देवस्थानाचे एकूण 49 गाळे असून त्यापैकी 4 गाळे माजी अध्यक्षांच्या कार्यकाळातच मुस्लिमांना देण्यात आले आहेत. तसेच, कोणाचे नातेवाईक कोण आहे? याबाबत आरोप करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला.

याशिवाय, देवस्थानाच्या जमिनीबाबतही गंभीर आरोप उपस्थित करण्यात आले आहेत. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, सरपंचांच्या मित्रमंडळींनी 10-12 एकर जागा अतिक्रमित केली, गोशाळा नावाखाली स्वतःची गोशाळा देवस्थानच्या जागेवर उभारली आणि यासाठी दहा एकर जमीन हडपण्याचा प्रकार केल्याचे चौकशीत पुढे आल्याचा दावा ट्रस्टने केला. विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे की, हिंदुत्वाचा मुद्दा फक्त प्रसिद्धीसाठी वापरला जात आहे; यामागचा उद्देश लोकांची दिशाभूल, पैसा मिळवणे आणि लोकप्रियता वाढवणे हा आहे. तसेच, देवस्थानाच्या व्यावसायिक जागेचे वाटप, गाळे करार, नूतनीकरण आणि जास्त रक्कम घेणे हे सर्व माजी अध्यक्षांच्या कार्यकाळात झाले आहे. भविष्यात देवस्थानातील जमिनीवरील मुरूम उत्खनन, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींबाबत महसूल महसूल प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...