Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबीड मध्ये ओबीसी समाजाची महाएल्गार सभा, मंत्री छगन भुजबळ म्हणाले अंतरवालीच्या जरांगे...

बीड मध्ये ओबीसी समाजाची महाएल्गार सभा, मंत्री छगन भुजबळ म्हणाले अंतरवालीच्या जरांगे पाटलांमुळे…

बीड |

- Advertisement -

ओबीसी समाजामधून हैदराबाद गॅझेटला विरोध होत आहे, या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे. मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडलं, हे अंतर अंतरवालीच्या जरांगे पाटलांमुळे पडलं, असा घणाघात यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

राज्यात अतिवृष्टी झाली, महापूर झाला तरी तुम्ही इथे आला, ओबीसींची एकजूट दाखवली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद . दिवाळी आली, पण कशा शुभेच्छा देऊ? आमच्या १५ लोकांनी आत्महत्या केली आहे, आरक्षण गेलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. मग कशी दिवाळी साजरी करायची आहे? असे मंत्री भुजबळ म्हणाले

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हे हायकोर्टाचे निर्णय आहेत. अरे तुम्ही कसं काय देता. सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं की मराठा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही. मग तुम्ही कसं काय देता. त्यावेळी मुख्यमंत्री कुठं होतं, मुख्यमंत्री नागपूरला होते, इथं यांनी निर्णय घेतला. पात्र शब्द काढून टाकला. मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे, सावधान, ही जी मंडळी आहेत ना तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारी आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं सांगत असल्याचं पाहायला मिळतं. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी वडेट्टीवार यांना एकच भूमिका घ्या असं सांगितलं. तासा तासाला तुम्ही जर बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल, असं छगन भुजबळ म्हणाले. आम्ही पक्षासाठी काम करत नाही, आम्ही ओबीसीसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही, असं देखील मंत्री भुजबळ म्हणाले.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...