Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘महाज्योती’ची शिष्यवृत्ती जाहिरात प्रसिद्ध; १२ मे पर्यंत करता येणार अर्ज

‘महाज्योती’ची शिष्यवृत्ती जाहिरात प्रसिद्ध; १२ मे पर्यंत करता येणार अर्ज

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

महात्मा जोतिबा फुले संशाधन आणि प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (महाज्योती) आचार्य (पीएच. डी.) पदवी मिळवणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेली शिष्यवृत्ती (फेलोशिप) मिळण्याच्या संदर्भातील जाहिरात ‘महाज्योती’कडून अखेर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

जाहिरातीनुसार महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (एमजेपीआरएफ) योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून ते १२ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत भरावयाचे आहेत.

महाज्योतीअंतर्गत पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती देण्याचा ठराव मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे ७ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री वडेट्टीवार यांनी ट्विट करून २०० संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची घोषणा करून जाहिरात काढण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या