Tuesday, February 18, 2025
Homeदेश विदेशMahaKumbh Mela 2025 : पंतप्रधान मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान; आकर्षक पेहरावाने वेधले...

MahaKumbh Mela 2025 : पंतप्रधान मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान; आकर्षक पेहरावाने वेधले लक्ष

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh Mela) सहभागी झाले आहेत. १४३ वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले असून आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. जवळपास अर्धा तास मोदींनी गंगा आरती करत गंगा नदीला वंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) सकाळी महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराज (Prayagraj) येथे दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला. यानंतर नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी ‘रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्रांचा जप केला. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) पवित्र अमृतस्नान केले. यावेळी त्यांनी संगम घाटावर खोल पाण्यात जाऊन तीन डुबक्या मारल्या.

यानंतर ते घाटावरच जप करताना दिसले. तर डुबकी मारताना मोदी यांनी दोर पकडला होता. यावेळी संगम स्नानानंतर पंतप्रधानांनी सूर्यालाअर्घ्य दिले. यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षाची माळही होती. सुमारे १५ मिनिटे मंत्रोच्चार करत मोदींनी सूर्याची (Sun) पूजा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.

दरम्यान, महाकुंभ सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच प्रयागराज दौरा असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच एटीएस आणि एनएसजीसह (ATS and NSG) इतर सुरक्षा पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. तर संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या