Monday, November 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिग्नल यंत्रणेत बिघाड करुन महालक्ष्मी एक्स्प्रेस रोखली; मध्यरात्री महिलांचे दागिने लुटले, रेल्वे...

सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन महालक्ष्मी एक्स्प्रेस रोखली; मध्यरात्री महिलांचे दागिने लुटले, रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

सातारा | Satara
महाराष्ट्रात रेल्वे प्रवासही आता सुरक्षित राहिला आहे का, असा संतप्त सवाल महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील दरोड्याच्या घटनेनंतर उपस्थित होत आहे. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ अचानक थांबली. प्रवासी गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या वायर कापून गाडी रोखल्याची माहिती समोर आली आहे.

आरक्षित डब्यांमधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे अंधारात पसार झाले. एवढ्यावरच न थांबता पळून जाताना त्यांनी रेल्वेच्या काही डब्यांवर दगडफेकही केली. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या थरारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -

सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दरोडा
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील साताऱ्यात सालपे रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर, आरक्षित डब्यातील झोपलेल्या 3 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सुमारे 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावून घेऊन गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रविवारी (1 नोव्हेंबर) मध्यरात्री 2.30च्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळ आली. त्यावेळी, काही जणांनी सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून गाडी थांबवली. यानंतर, 5 ते 6 जणांच्या टोळीने महिला प्रवाशांना लक्ष्य केले.

कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यावेळी, पाठलाग होऊ नये यासाठी पळून जाताना चोरट्यांनी एस-2, एस-3 आणि एस-5 या डब्यांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

वर्षभरात रेल्वे मार्गावर चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती
महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटनेनंतर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. याच मार्गावर भिलवडी आणि ताकारी परिसरातही यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सालपे येथील घटनेमुळे वर्षभरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे मार्गावरील निर्जन ठिकाणी सिग्नल यंत्रणेचे संरक्षण, रात्रीची गस्त, संवेदनशील भागांतील देखरेख आणि रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था याबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

दिल्लीत मोठ्या घडामोडी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट? कारण...

0
नवी दिल्ली | New Delhiविधान परिषद निवडणुकीतील पराभव आणि पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या नेतृत्वाबाबत, मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत आणि...