Thursday, October 24, 2024
HomeनाशिकNashik News : दुसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल; गुरुपुष्यामृत योगावर जास्त नामांकन?

Nashik News : दुसऱ्या दिवशी सहा अर्ज दाखल; गुरुपुष्यामृत योगावर जास्त नामांकन?

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) धामधूमीला वेग आला आहे. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तसेच दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गुरुवारी (दि. २४) गुरुपुष्यामृत योगावर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभरात सहा जणांनी अर्ज दाखल केले. शहर परिसरातून एकही अर्ज दाखल झाला नाही. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी लगबग सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मालेगाव बाह्य व नाशिक पूर्व या दोन मतदारसंघांत एक-एक अर्ज दाखल झाला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

काल दुसऱ्या दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात कळवण विधानसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी अर्ज दाखल केला आहे. नांदगाव मतदारसंघातून भगवा नामदेव सोनवणे यांचा अर्ज दाखल झाला आहे. दिंडोरी मतदारसंघातून हिरामण गांगुर्डे व काशिनाथ वाटाणे यांनी उमेदवारी अर्जदाखल केले आहेत. तर निफाड मतदारसंघातून सुनील लगड व देवराज जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.पश्चिममध्ये आघाडीसह महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्याने येथील चित्र आता स्पष्ट झाले आहे. मात्र इतर मतदारसंघात दोन्ही बाजूचे उमेदवार जाहीर नसल्याने लढत स्पष्ट झालेली नाही.

हे देखील वाचा : Nashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये बंडखोरी?

नाशिक शहरात एकूण पाच मतदारसंघांसाठी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू आहे. त्यात नाशिकमधील तीन विधानसभा क्षेत्र, देवळाली आणि इगतपुरी या मतदारसंघांचा समावेश केला जातो. नाशिक पश्चिममध्ये १६ उमेदवारांनी ३१ अर्ज खरेदी केले आहेत. त्यात विद्यमान आमदार सीमा हिरे, महेश हिरे, दिलीप दातीर, करण गायकर यांचा समावेश आहे. नाशिक पूर्वमधून १४ उमेदवारांनी १६ अर्ज खरेदी केले आहेत. त्यात आमदार राहुल ढिकले, बाळासाहेब सानप यांच्यासह आदिती ढिकले, रोहन देशपांडे यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

नाशिक मध्यमधून इच्छुकांनी संख्या जास्त असेल, असा अंदाज आहे. २२ इच्छुकांनी त्यासाठी ४० अर्ज नेले आहेत. त्यात आ. देवयानी फरांदे, रंजन ठाकरे, सुरेश अण्णा पाटील, वसंत गिते, स्वाती जाधव, कृणाल पाटील, अंकुश पवार, प्रथमेश गिते, राहुल दिवे यांनी अर्ज खरेदी केले. देवळाली मतदारसंघासाठी डॉ. राजश्री अहिरराव, लक्ष्मी ताठे, अविनाश शिंदे, प्रीतम आढाव यांनी अर्ज नेले आहेत. तर इगतपुरी- त्र्यंबकमधून सात उमेदवारांनी १३ अर्ज खरेदी केले आहेत. इगतपुरी- त्र्यंबकेश्वर येथून आमदार हिरामण खोसकर, वामन खोसकर, भाऊसाहेब डगळे, कावजी ठाकरे, डॉ. शरद तळपदे यांनी अर्ज नेले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Political : “शरद पवारांचा मला आशीर्वाद…”; नरहरी झिरवाळांचे मोठे विधान

दरम्यान, अद्याप सर्वपक्षीय उमेदवारी जाहीर नसल्याने अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू नसली तरी गुरुवारी (दि. २४) गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. इतर मतदारसंघांतूनही प्रत्येकी सुमारे १५ उमेदवारांनी अर्ज खरेदी केले असून एकही अर्ज अद्याप दाखल करण्यात आलेला नव्हता.

बंडखोरीची शक्यता

विधानसभा उमेदवारीसाठी वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दूसऱ्या दिवशी नाशिक शहरातील एकाही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. मात्र काही विद्यमान आमदारांसह इच्छुकांनीही अर्ज खरेदी केल्याने बंडखोरीचे वारे वाहत आहेत काय, अशी शंका निर्माण होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या