Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयमोठी बातमी! राष्ट्रवादीकडून १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप; कुणाचा आहे समावेश?

मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप; कुणाचा आहे समावेश?

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काल (रविवारी २० ऑक्टोबर) रोजी भाजपकडून विधानसभेसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही उमेदवार जाहीर केले असून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते त्यांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी -त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार हिरामण खोसकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. खोसकर यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यासोबतच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.त तसेच छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नवापूर मतदारसंघातून भरत गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भरत गावित हे पूर्वी भाजपात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

या नेत्यांना मिळाला एबी फॉर्म

राजेश विटेकर
संजय बनसोडे
चेतन तुपे
सुनील टिंगरे
दिलीप वळसे पाटील
दौलत दरोडा
राजेश पाटील
दत्तात्रय भरणे
आशुतोष काळे
हिरामण खोसकर
⁠नरहरी झिरवळ
⁠छगन भुजबळ
⁠भरत गावित
⁠बाबासाहेब पाटील
⁠अतुल बेनके

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...