मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. दरम्यान आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांची विधीमंडळ परिसरात खडाजंगी पाहायला मिळाली. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
विधानभवना बाहेर नेमकं काय घडलं?
विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं. त्यावर अबू आझमी यांनीही हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे असं म्हटलं.
शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमची पापं लपवण्यासाठी…”
त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. पाहिल्यानंतर तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान आहे असं नितेश राणे म्हणाले. तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असं नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले.
यांना सत्य स्विकारायचं नाही आहे. यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. पण सत्य ऐकण्याची ताकद यांच्यात नाही. काही मोजक्या लोकांना हाताशी धरुन त्यांना मोठं केलं जात आहे. यांच्या अशा वागण्यांमुळे त्यांना मदत होते यांना ही साधी गोष्ट कळत नाही. यांच्यामुळे जर त्या मुलींचं आयुष्य बर्बाद होत असेल तर ते योग्य नाही, असा संताप नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमुकल्याचा अखेर मृत्यू
मी खरं बोलतोय हे त्यांना पटलं नाही. आपण आज किंवा उद्या उघडे पडणार याची त्यांना कल्पना आहे, म्हणून ते जवळ आले होते. पण यांच्यामुळे आमच्या काही हिंदू मुलींचा आयुष्य बर्बाद होणार तेव्हा हे येणार का? काही मुलींना सौदीत विकलं जातं, तेव्हा हे मदतीला येणार का? येथे बोलण सोपं आहे. त्या मुलींचं अश्रू पुसायला गेले तर यांना सत्य कळेल, असं नितेश राणेंनी सांगितलं.
परंतु, आपल्या हिंदू तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, तेव्हा हे जबाबदारी घेतील का ? यांच्या हरकतीमुळे अशा लोकांना मदतच होत आहे. हे त्यांना कळत नाही. लव्ह जिहादवरून हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होऊल तेव्हा हे पुढे येतील का ? यांच्या सारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल, तर हे योग्य नाही, असा संताप भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.