Thursday, June 11, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Assembly Monsoon Session : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; सरकारवर डागली तोफ, म्हणाले...

Maharashtra Assembly Monsoon Session : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; सरकारवर डागली तोफ, म्हणाले “हे महायुतीचे…”  

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session 2025) उद्या सोमवारपासून (दि. ३०) सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर आरोपांची तोफ डागली. तसेच चहापानाच्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार घातल्याची माहिती मविआच्या नेत्यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, “उद्यापासून अधिवेशन सुरू होत असून, त्याच्या पूर्व संध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच लोक आज सत्ताधारी बाकावरील सदस्य म्हणून चहा पाण्याला येणार आहेत. त्यामुळे जे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत त्यांच्या चहा पाण्याला जाणे हे पाप असून, हे महायुतीचे सरकार (Mahayuti Government) नसून महाझुटी सरकार आहे”, असे त्यांनी सांगितले.

तसेच “मुख्यमंत्री (CM) आज त्यांना बघतील आणि मनात म्हणतील हाच तो माणूस ज्यांच्यावर मी आरोप केले होते. ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सरकारचे तीन दिशेला तीन तोंडं आहेत. यांच्यात कुठल्या जिल्ह्याचे कोण ‘मालक’मंत्री होणार? कोण पालकमंत्री होणार? यावरून एकमेकांमध्ये भांडण सुरू आहे. माझा फंड यांनी चोरला, त्यांनी चोरला असे मुख्यमंत्र्यांसमोर सांगतात. त्यामुळे यांच्यामध्ये अजून समन्वयाची गरज आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

मंत्री दादा भुसेंवर पालकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप

पुढे ते म्हणाले की, ” टीका झाल्यानंतर २५ लाख विद्यार्थ्यांमधून अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यासाठी आम्ही आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे सरकारला घाबरून पहिली यादी जाहीर करावी लागली. यादी जाहीर झाल्यानंतर रात्री अनेक पालकांनी आम्हाला फोन केले. पहिली यादी जाहीर झाली, त्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झाले आहेत. दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर पालकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, “बळीराजाच्या जीवावर जगत असताना हे सरकार शेतकरी यांना म्हणते की तुमच्या पायातल्या चप्पल आम्ही दिल्या, तुमच्या अंगावरचे कपडे आम्ही दिले, अशा सरकारच्या चहा पानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. त्यांच्या सरकारमध्ये पैसे आणि टक्केवारी दिल्याशिवाय कुठलीच कामे होत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, “महायुती सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. ज्या ठिकाणी नगरसेवक फोडले जात आहेत त्याठिकाणी तीन ते चार कोटी रुपये दिले जात आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. तसेच एका टेंडरसाठी तीन-तीन हजार कोटी रुपये खाल्ले जात असून, १२ कोटी जनतेचे पैसे खाणे सरकारने सुरु केले आहे,” असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...