Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahuri By Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी पाठवले दोन...

Rahuri By Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी पाठवले दोन एबी फॉर्म; भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात अधिकृत उमेदवार कोण?

मुंबई | Mumbai

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) २३ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर ४ मे रोजी या पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर होईल. भाजप नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर आता या मतदारसंघातून भाजप शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून ‘या’ बड्या नेत्याची माघार; DCM सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने राहुरीत (Rahuri) उमेदवार दिला जाणार असून, प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र,आज सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेतल्याने ते अर्ज भरणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुरी पोटनिवडणुकीसाठी दोन एबी फॉर्म पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज; म्हणाल्या, “मला स्वप्नातही…”

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांना हे एबी फॉर्म दिले आहेत. तनपुरे यांनी उमेदवारी न स्वीकारल्यास पक्षाचा दुसरा एबी फॉर्म गोविंदराव मोकाटे यांना दिला जाणार आहे. मोकाटे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पक्षाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अधिकृत उमेदवार कोण? हे लवकरच स्पष्ट होईल. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही आपली रणनीती ठरवण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Rahuri By Election 2026 : राहुरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखे पाटलांची प्राजक्त तनपुरेंशी बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

शिंदे सेनेच्या नेत्याने भरला अर्ज

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी मतदारसंघातील आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी मला शेतकर्‍यांनीच उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Anjali Damania : DCM शिंदेंच्या पीएचे खरातसोबत कॉल, समता पतसंस्थेतही अनेक व्यवहार; सीडीआर कुठून मिळाला? दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं

चव्हाण-विखे यांनी घेतली तनपुरेंची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात आज (सोमवारी) सकाळी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल करणार की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

ताज्या बातम्या

व्हिएतनामची कंपनी राज्यात साडेसहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शाश्वत नागरी विकास, औद्योगिक आणि पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात...