Monday, May 4, 2026
HomeराजकीयRahuri By Election 2026 : राहुरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या राजकीय...

Rahuri By Election 2026 : राहुरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठ्या राजकीय घडामोडी; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री विखे पाटलांची प्राजक्त तनपुरेंशी बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

अहिल्यानगर | Ahilyanagar

महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी (Baramati and Rahuri Assembly Constituencies) येत्या २३ एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर ४ मे रोजी या पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर होईल. आज (सोमवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही ठिकाणची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राहुरी विधानसभेसाठी भाजपने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्याआधीच राहुरीत मोठी घडामोड घडली आहे.

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल करणार की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून ‘या’ बड्या नेत्याची माघार; DCM सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा?

दरम्यान, या चर्चेनंतर तनपुरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, “भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला निवडणूक (Election) न लढविण्याची विनंती केली आहे. त्यांनी विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत (CM) चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यानंतर आता मला कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा लागेल”, असे त्यांनी म्हटले.

रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

प्राजक्त तनपुरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “महाराष्ट्रातील एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे हे गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतील, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Shrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील खंडाळा (Khandala) शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे (Railway) मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह (Youth and Young Girl Dead Body) रेल्वेखाली चिरडलेल्या...