Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Expansion : अजित पवारांचे आज शपथ घेणाऱ्या मंत्र्याबाबत मोठे विधान;...

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांचे आज शपथ घेणाऱ्या मंत्र्याबाबत मोठे विधान; म्हणाले, “अडीच वर्ष…”

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) आज नागपुरातील (Nagpur) राजभवनात संपन्न होत आहे. राजभवनात खुर्च्यांची मांडणी करण्यात आली असून आज २० कॅबिनेट आणि १९ राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मंत्रिमंडळ विस्तारावर मोठे भाष्य केले आहे.

- Advertisement -

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) मेळावा नागपुरातील देशपांडे हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते. यावेळी बोलतांना अजित पवार यांनी मंत्रिपदांसाठीचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की, “मंत्रिमंडळात संधी मिळावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण जागा मर्यादित असतात. सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात. मागच्या वेळीस आपण सरकारमध्ये गेलो. आपल्याला दीड वर्षांची कारकीर्द मिळाली. शपथ (Oath) घेतलेल्या मंत्र्यांना दीड वर्षांचा कार्यकाळ मिळाला”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “आता येणाऱ्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत साधारणत: आम्ही लोकांनी असं ठरवलंय की काही जणांना अडीच-अडीच वर्षांकरता संधी द्यायची. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यातून सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना यातून प्रतिनिधीत्व मिळेल. अनेक भागांना यामुळे प्रतिनिधीत्व मिळेल. याबद्दल आम्हा तिघांमध्ये एकवाक्यता झालेली आहे. आज शपथ घेणारे काही जण अडीच वर्षच मंत्री असतील आणि याबद्दल तीन पक्षांमध्ये एकमत झाले आहे”, असे अजित पवारांनी म्हटले. त्यामुळे आज शपथ घेणाऱ्या तिन्ही पक्षातील काही मंत्र्यांना अडीच वर्षांनंतर डच्च मिळेल हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Cabinet Minister List) अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. यात नाशिक जिल्ह्यातून तीन जणांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या कोट्यातून दादा भुसे यांना तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांना संधी मिळाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...