Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Cabinet Expansion : बावनकुळे, मुंडे, भुसे यांच्यासह ३९ जणांनी घेतली मंत्रिपदाची...

Maharashtra Cabinet Expansion : बावनकुळे, मुंडे, भुसे यांच्यासह ३९ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर | Nagpur

लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व यश मिळवले. राज्यात महायुतीला २३५ जागांवर घवघवीत बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मात्र ४९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर (आज दि.१५ डिसेंबर) रोजी नागपूर येथील राजभवनात मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. यात ३३ आमदारांनी कॅबिनेट तर ६ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरुवातीला कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल सावे, अशोक उईके, आकाश फुंडकर, संजय सावकारे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तर शिवसेनेकडून भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराजे देसाई, प्रकाश आबिटकर,संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर योगेश कदम आणि आशिष जैस्वाल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

क्रमांक पक्ष मंत्र्यांचे नाव जबाबदारी \ खाते
भाजपा देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी अजित पवार उपमुख्यमंत्री
भाजपा चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री
भाजपा राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री
भाजपा मंगलप्रभात लोढा कॅबिनेट मंत्री
भाजपा आशिष शेलार कॅबिनेट मंत्री
भाजपा पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री
भाजपा गणेश नाईक कॅबिनेट मंत्री
१० भाजपा जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री
११ भाजपा शिवेंद्रराजे भोसले कॅबिनेट मंत्री
१२ भाजपा अतुल सावे कॅबिनेट मंत्री
१३ भाजपा संजय सावकारेकॅबिनेट मंत्री
१४ भाजपा अशोक उईके कॅबिनेट मंत्री
१५ भाजपा चंद्रकांत पाटीलकॅबिनेट मंत्री
१६ भाजपा जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री
१७ भाजपा गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री
१८ भाजपा नितेश राणे कॅबिनेट मंत्री
१९भाजपा आकाश फुंडकरकॅबिनेट मंत्री
२०भाजपा पंकज भोयर राज्यमंत्री
२१भाजपा मेघना बोर्डीकरराज्यमंत्री
२२ भाजपा माधुरी मिसाळराज्यमंत्री
२३शिवसेना दादा भूसेकॅबिनेट मंत्री
२४शिवसेना उदय सामंतकॅबिनेट मंत्री
२५शिवसेना शंभूराज देसाईकॅबिनेट मंत्री
२६शिवसेनागुलाबराव पाटीलकॅबिनेट मंत्री
२७शिवसेनासंजय शिरसाटकॅबिनेट मंत्री
२८शिवसेनाप्रताप सरनराईककॅबिनेट मंत्री
२९शिवसेनाभरत गोगावलेकॅबिनेट मंत्री
३०शिवसेनाप्रकाश आबिटकरकॅबिनेट मंत्री
३१शिवसेनासंजय राठोडकॅबिनेट मंत्री
३२शिवसेनाआशिष जैस्वालराज्यमंत्री
३३शिवसेनायोगेश कदमराज्यमंत्री
३४राष्ट्रवादी हसन मुश्रीफकॅबिनेट मंत्री
३५राष्ट्रवादी धनंजय मुंडेकॅबिनेट मंत्री
३६राष्ट्रवादी दत्तात्रय भरणेकॅबिनेट मंत्री
३७राष्ट्रवादी आदिती तटकरेकॅबिनेट मंत्री
३८राष्ट्रवादी माणिकराव कोकाटेकॅबिनेट मंत्री
३९राष्ट्रवादी नरहरी झिरवाळकॅबिनेट मंत्री
४०राष्ट्रवादी मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री
४१राष्ट्रवादी बाबासाहेब पाटीलकॅबिनेट मंत्री
४२राष्ट्रवादी इंद्रनील नाईक राज्यमंत्री

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...