Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे सरकारमधील 'या' १२ मंत्र्यांचा पत्ता कट

Cabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे सरकारमधील ‘या’ १२ मंत्र्यांचा पत्ता कट

नागपूर | Nagpur

मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपाच्या घोळामुळे लांबलेला फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा (Mahayuti Government) बहुप्रतिक्षित पहिला मंत्रिमंडळ महाविस्तार रविवारी नागपूर येथील राजभवनावर (Rajbhavan) पार पडला. या विस्तारात ३३ जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ जणांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळात ३९ मंत्र्यांच्या समावेश केल्यामुळे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. नियमानुसार मंत्रिमंडळाचा आकार जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नव्याने मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) करताना भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, डॉ. विजयकुमार गावित, सुरेश खाडे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील आणि संजय बनसोडे या नेत्यांचे पत्ते कापत त्यांना जबरदस्त धक्का दिला.

फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत अनिश्चितीच्या भोवऱ्यात सापडलेल्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर मार्गी लागला. शपथविधीची वेळ संध्याकाळी चार वाजता होती. मात्र, शपथविधीचा सोहळा ४० मिनिटे उशिरा सुरु झाला. परिणामी, सूर्यास्तावेळी राष्ट्रध्वज उतरवताना शपथविधीचा सोहळा काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

भाजपच्या मंगलप्रभात लोढा वगळता सर्व मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली. लोढा यांनी संस्कृत भाषेतून मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. राजभवनाच्या हिरवळीवर मावळतीच्या उन्हात रंगलेल्या शपथविधी सोहोळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचे आप्तस्वकीय आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक मंत्र्यांच्या शपथविधीवेळी उपस्थितांमधून उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या जात होत्या.

प्रदेशनिहाय प्रतिनिधित्व

कोकण – भाजप : निलेश राणे, शिंदे गट : उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम, राष्ट्रवादी (अजित पवार): अदिती तटकरे

मुंबई – ठाणे – भाजप : मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, गणेश नाईक, शिवसेना शिंदे प्रताप सरनाईक,

उत्तर महाराष्ट्र – भाजप : राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावल, शिवसेना शिंदे : गुलाबराव पाटील, दादा भुसे, राष्ट्रवादी (अजित पवार) : माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ

पश्चिम महाराष्ट्र – भाजप : चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, शिवसेना शिंदे : प्रकाश आबिटकर, शंभूराज देसाई, राष्ट्रवादी (अजित पवार) : हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील

मराठवाडा – भाजप : पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघमा बोर्डीकर- साकोरे, शिवसेना शिंदे: संजय शिरसाट, राष्ट्रवादी (अजित पवार) : धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील,

विदर्भ – भाजप : चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आकाश फुंडकर, पंकज भोयर, शिवसेना शिंदे : संजय राठोड, आशीष जयस्वाल, राष्ट्रवादी (अजित पवार) : इंद्रनील नाईक

मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी भरभरुन दिलेल्या आशीर्वादाची जाणीव ठेवत फडणवीस सरकारने आपल्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींचा समावेश केला आहे. यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर सामोरे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांचा समावेश आहे. यापैकी मिसाळ आणि बोर्डीकर यांनी प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. माधुरी मिसाळ आणि बोर्डीकर या दोघीही सलग २००९ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत. त्यांना प्रथमच फडणवीस मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळात १८ नवे चेहरे

महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १८ नव्या चेहन्यांना स्थान देण्यात आले आहेत, गेली अनेक वर्ष विधानसभेवर सातत्याने निवडून येत असलेल्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेधना बोर्डीकर, नितेश राणे, हिंदे गटाचे प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशीष जयस्वाल, योगेश कदम तर अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे.

मंत्र्यांची संख्या

मुंबई, ठाणे, कोकण : ९
उत्तर महाराष्ट्र : ८
पश्चिम महाराष्ट्र : ९
मराठवाडा : ६
विदर्भ : ७

पक्षनिहाय मंत्री

भाजप -कॅबिनेट : १६, राज्यमंत्री : ३
शिवसेना शिंदे – कॅबिनेट : ९, राज्यमंत्री : २
राष्ट्रवादी अजित पवार -कॅबिनेट : ८, राज्यमंत्री : १.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...