Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCabinet Meeting: मोठी बातमी! जात वैधता प्रमाणपत्रबाबत मोठा निर्णय; मंत्रीमंडळ बैठकीत ७...

Cabinet Meeting: मोठी बातमी! जात वैधता प्रमाणपत्रबाबत मोठा निर्णय; मंत्रीमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (28 ऑक्टोबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मंत्रालयात नवीन सेलची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापना केली आहे.

- Advertisement -

आएफएस राजेश गावंडे यांची नियुक्ती केल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आता मंत्रालयातील राजशिष्टाचार अधिकारी यांना मिळणार अधिकची जबाबदारी मिळणार आहे. राजशिष्टाचार सोबतच परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि संपर्क याची ही जबाबदारी असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या पदाला नव्याने मान्यता देण्यात आली.

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेले निर्णय
आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, धुळे आणि वाशिम या जिल्ह्यांना निर्णयाचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. नियोजन विभाग, गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविका विभाग, महसूल विभाग आणि विधि न्याय विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेण्यात आले वाचा सविस्तर.

नियोजन विभाग- विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) गठीत करणार. राज्यातील नागरिकांकडून मते व प्रतिसाद मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून डॉक्युमेंट तयार. राज्य व जिल्हा पातळीवरील १६ संकल्पना निश्चित. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या अंतर्गत १०० उपक्रम निश्चित.


गृह विभाग- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास व राज्य शासनाच्या ५० टक्के हिश्श्यानुसार अधिकचा निधी देण्यास मान्यता.


सामान्य प्रशासन विभाग- सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार. सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणुक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) / Secretary (Protocol, FDI, Diaspora Affairs and Outreach) अशा पदनाम विस्तारास मान्यता. याशिवाय परकीय थेट गुंतवणूक (FDI), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) आणि परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs) अशा तीन नवीन कार्यासनांच्या निर्मितीस आणि या कार्यासनांसाठी आवश्यक पदांना मंजुरी.


नगरविकास विभाग- महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.


ग्रामविकास विभाग- ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत. त्यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास मान्यता.


विधि न्याय विभाग- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालय होणार. या दोन्हींसाठी आवश्यक पदांना व खर्चाच्या तरतुदीस मंजुरी.


महसूल विभाग- वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशन, रिसोड यांना मौजे करडा ( ता. रिसोड) येथील २९.८५ हे. आर जमीन. या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील ३० वर्षाकरिता नुतनीकरणास मान्यता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

SET Exam 2026 – सेट परीक्षेची तारीख जाहीर

0
पुणे | प्रतिनिधी Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा)...