Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय!

Cabinet Meeting Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय!

मुंबई । Mumbai

- Advertisement -

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव गैरहजर राहिले.

आजच्या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरले ते अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक कारवाईचा प्रभाव! शासकीय व निमशासकीय बैठका, कार्यक्रम आणि उपहारगृहांमध्ये आता आरोग्यदायी (हेल्दी) अन्नपदार्थच ठेवले जातील, या विशेष धोरणाला मंत्रिमंडळाने अखेर अधिकृत मान्यता दिली आहे. शासकीय कार्यक्रमांमधील जंक फूडला फाटा देत सर्वसामान्यांसह अधिकाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा निर्णय प्रशासनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आरोग्याची ही ‘नवी वाट’ राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 4 महत्वाचे निर्णय

  • नशा मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)
  • शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधनकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)
  • सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5 हजार 704 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी. सुमारे 1 लाख 44 हजार 912२ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी मिळणार. (जलसंपदा विभाग)

ताज्या बातम्या