सार्वमत
मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत करोनाचे 2608 नवीन रुग्ण आढळले आहेत तर त्याचवेळी 821 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर करोनामुळे 24 तासांत आणखी 60 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा 50 हजारच्या दिशेने मार्गक्रमण करत असून आज हा आकडा 47,190 वर पोहचला आहे. सध्या 32,201 करोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.




