Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Day : CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन

Maharashtra Day : CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच १ मे महाराष्ट्र दिनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठी जनतेला ६३ व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी मराठीतून ट्विट करत मराठी माणसाचं कौतुक केलंय.

- Advertisement -

महाराष्ट्राला सहसासहजी काही मिळालेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी महाराष्ट्राने संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संघर्षातून, शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानाच्या त्यागातून झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हेदेखील महाराष्ट्रात यावे, ही मागणी होताी. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे.

तात्पुरते लग्न करून युवकाला दोन लाखांचा गंडा

आजही सीमावासियांना आणि सीमाभागातील खेड्यांना महाराष्ट्रात सहभागी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा संघर्ष आजही सुरु आहे. असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी मुख्य सचिव, राज्याते महिला व बालकल्याण मंत्री मगलप्रभात लोढा तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीतून ट्विट करत मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ”महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो”, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या