Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; अशी तपासा मेरिट लिस्ट

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; अशी तपासा मेरिट लिस्ट

मुंबई | Mumbai

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालय अलॉट करण्यात आलेली संख्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

- Advertisement -

या यादी मध्ये सर्वाधिक विध्यार्थी विज्ञान शाखेतून 19 हजार 153 ,वाणिज्य शाखेतून 15 हजार 250 विद्यार्थी,कला शाखेत 3 हजार 834 तर व्होकेशनल शाखेत 621 विध्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या 33 हजार 197 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले आहे.

तुम्हाला कॉलेज अलॉट झालं का ते असं पाहा

– आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.

– आपला आयडी पासवर्ड देऊन याठिकाणी लॉगिन करा.

– ल़ॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.

– डॅश बोर्डवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.

– कॉलेज अलॉट झालं असेल तर तुमचं नाव इथे दिसेल

विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट रोजी सायंकाळ 5 वाजे पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.अकरावी साठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.विद्यार्थ्यांना आपली कागद पत्रे कॉलेज लॉगीनमध्ये जाऊन अपलोड करता येतील. आणि बघता देखील येतील.या मुळे कॉलेजात जाऊन कोणीही गर्दी करू नये असे सांगण्यात आले आहे.’पेमेंट गेट वे ‘ने भरावे लागणार.अकरावी प्रवेश समितीनुसार,जर एकाद्या विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाण पत्र नाही त्यांनी कागद पत्रांसह क्रिमिलियर प्रमाणपत्र साठीचा दिलेला अर्ज सादर करावा.यासाठी त्यांना 21 दिवसांची मुदत दिली जाईल.प्रवेश प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या