Thursday, March 13, 2025
HomeनगरMaharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ ! शिवराज राक्षेने पंचाला...

Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ ! शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत (Maharashtra Kesari Competition) शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्याने पंचाच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांना लाथ मारल्याचा व कॉलर पकडल्याने गोंधळ उडाला आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ (Prithviraj Mohol) यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय मान्य न झाल्यानेे शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर पकडल्याने पोलिसांना मध्यस्ती करावी लागली. या गोंधळानंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (DCM Ajit Pawar) गेले.

मात्र, माझी पाठ टेकली नव्हती, असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव (Saket Yadav) यांच्यात सामना रंगला होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगणार आहे.

कुस्तीचा रिव्ह्यू दाखवावा
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आता शिवराज राक्षे याने आपला रिव्ह्यु दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...